आमच्याविषयी

राजपुत विवाहमंच

"राजपुत विवाहमंच " हे राजपुत समाजातील इच्छुक वधु-वर यांच्यासाठी एकमेव सेवा देणारे व्यासपीठ.

आमचे मिशन

आपला राजपुत समाज हा खूप विखुरलेला आहे असे आम्हास प्रखरतेने जाणवत आहे. याकारणामुळे समाजातील अनेक लग्नासाठी इच्छुक मंडळी यांना योग्य तो जोडीदार मिळण्यास अत्यंत कठीण जात आहे. आम्ही इच्छुक वधु-वर यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयन्त करत आहोत.

आमचे उद्दिष्टय

आपल्या राजपुत समाजातील सर्व घटकांना सेवा पुरवणे आणि त्यानां योग्य तो जोडीदार मिळवा हाच आमचा हेतू आहे. आम्ही भविष्यात "राजपुत विवाहमंच" ह्या वेबसाईट वर अजून हि काही सेवा आणण्यास प्रयत्नशील आहोत. समाज-हित हेच उद्दिष्ट.

का ?

आपल्या पालकांना त्यांच्या मुला-मुलींसाठी चांगला जोडीदार शोधण्यास सोपे जावे म्हणुन हे व्यासपीठ तयार केले आहे.

नियम व अटी

जुळणार्‍या प्रोफाइलचे संपर्क तपशील फोन कॉलवर किंवा व्हॉट्सअॅपवर किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रदान केले जाणार नाहीत. हे फक्त विनंती फॉर्म सबमिट केल्यानंतर, नोंदणीकृत ईमेल आयडीवरील ईमेलद्वारे प्रदान केले जाऊ शकते.

सदस्याचे प्रोफाइल टेलिफोनिक किंवा ईमेल विनंतीद्वारे बदल केले जाऊ शकते. प्रोफाइलमध्ये वारंवार बदल करण्यास नकार दिला जाऊ शकतो.

प्रोफाइल एकदाच तयार करता येईल. त्यामधे नंतर बदल करता येणार नाही.

सदस्यांनी त्यांचे लग्न आमच्या मॅरेज साईट किंवा इतर कोणत्याही स्त्रोताद्वारे निश्चित केले असल्यास ईमेल किंवा फोन कॉलद्वारे आम्हाला कळवावे. त्यानुसार त्यांचे प्रोफाइल वेबसाइटवरून काढून टाकले जाईल.

लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रोफाइलमध्ये असलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करणे ही सदस्यांची जबाबदारी आहे.

वेबसाइटवरून संपर्क तपशील घेऊन सदस्यांमध्ये झालेल्या कोणत्याही क्रॅशसाठी आम्ही जबाबदार नाही. आम्ही फक्त संबंधित सदस्यांचे सदस्यत्व त्वरित रद्द करू शकतो.

ज्या विवाहित जोडप्याचे लग्न आमच्या मॅरेज साईट द्वारे सेटल झाले आहे त्यांच्यामध्ये झालेल्या कोणत्याही क्रॅशसाठी आम्ही जबाबदार नाही.

rajputshadi.com चे सदस्य बनून आणि/किंवा या साइटच्या सेवा वापरून, तुम्ही बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे पुष्टी करता की तुम्ही वरील तरतुदी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहात.


हि वेबसाईट कमीत-कमी खर्चात चालावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. सर्वात जास्त खर्च हा होस्टिंग म्हणजेच सर्व्हरचा येतो. आणि सर्व्हरचा खर्च हा नियमित येणार आहे. आपण जर समाज-कार्यसाठी आर्थिक हातभार लावू इच्छित असाल तर खालील माध्यमांचा वापर करावा. जे लोक आर्थिक मदत करू शकत नाहीत त्यांनी हि वेबसाईट गरजू लोकांपर्यंत पोहचवावी. आपण केलेली मदत हि अजून नवीन-नवीन सेवा आणण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. समाजसेवा हेच माझे उद्दिष्ट आहे.

तसेच फीडबॅक, सूचना वेबसाईट मध्ये काही अजून चांगले बदल यासाठी काही सूचना असतील तर 7620292010 या नंबर वर व्हाट्सअँप किंवा rajputvivahmanch29@gmail.com वर ईमेल करा.